सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष प्रचार गीत प्रसिद्ध करत आहे. ठाकरे गटाकडून देखील प्रचार गीत प्रसिद्ध करण्यात आलं. त्यात जय भवानी हा शब्द गीतातून काढण्याचं नोटीस ठाकरे गटाला निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं. निवडणूक आयोगाने बजावलेल्या नोटीसच्या आक्षेपावर फेरविचार करावा असा अर्ज ठाकरे गटाने दाखल केला. हा अर्ज निवडूक आयोगाने फेटाळून लावला आहे. अशी माहिती समोर येत आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या नोटीस मध्ये म्हटलं आहे की प्रचार गीतात कोणत्याही धार्मिक शब्दाचा उल्लेख असू नये. या मध्ये जय भवानी शब्दाचा उल्लेख निवडणूक आयोगाने केलेला नाही. मात्र ठाकरे गटाने जय भवानी या शब्दावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतल्याचं म्हटलं आहे. प्रचारगीतावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतल्यावर ठाकरे गटाने आम्ही गीतातील जय भवानी शब्द बदलणार नाही असे स्पष्ट सांगितले. ठाकरे गटाकडून फेरविचार अर्ज दाखल करण्यात आला असून आता या अर्जाला निवडणूक आयोगाने फेटाळून लावल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का मिळाला आहे.