एके काळी प्रत्येक स्त्री साडी नेसत असे तर एक काळ असा देखील आला जेव्हा साडी नेसणारी स्त्री दुर्बल, रूढिवादी किंवा मागासलेली समजली जात असे. पण आजच्या काळात महिलांची ओळख त्यांच्या कपड्यांवरून न करता त्यांच्या कामावरून करण्याची गरज आहे. याचे उत्तम उदाहरण एका तरुणीला बघून कळून येईल, जिने साडी नेसून असा पराक्रम केला आहे की ती पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल.
इंस्टाग्राम युजर शालू किरार एक फिटनेस मॉडेल आणि जिम्नॅस्ट असून त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी असे करतब दाखवले आहे जे बघून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. जिम्नॅस्टचे शरीर लवचिक असले तरी साडी नेसून हे पराक्रम करणे वेगळे आहे.