व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला पार्ले जी बिस्किटांचे पकोडे बनवताना दिसत आहे. साधारणपणे लोक बटाटा, कांदा, वांगी, मिरची, पालक, कोबी इत्यादी वेगवेगळ्या भाज्यांचे पकोडे बनवतात. पण पार्ले जी बिस्कीटचे पकोडे क्वचितच कोणी खाल्ले असतील. खाणे सोडा, बिस्कीट पकोडे बनवण्याचा विचारही कोणी केला नसेल. पण कदाचित या खाद्यपदार्थाचा शोध लावायचाच होता, म्हणूनच या महिलेने भाजीऐवजी बिस्किटांचे पकोडे बनवले.