एसडीए चे सचिव राजेंद्र प्रसाद त्रिपाठी यांच्या म्हणण्यानुसार, प्राधिकरणाने ताजमहालाच्या टोल टॅक्स वाढविण्याचा प्रस्ताव सरकारला पाठविला असून, शासनाने हा प्रस्ताव पास केल्यास ताजमहालाच्या तिकीट दरात 1 एप्रिल पासून वाढ होण्याची शक्यता आहे.
एडीएच्या प्रस्तावावर शिक्का मोर्तब झाल्यानंतर ताजमहालाचे प्रवेश शुल्क भारतीयांसाठी 80 रुपये आणि परदेशींसाठी 100 रुपये ते 1200 रुपयापर्यंत वाढेल. एवढेच नव्हे तर आता देशी -परदेशी पर्यटकांना मुख्य गुमटला भेट देण्यासाठी 400 रुपये खर्च करावे लागणार. सरकार ने हा प्रस्ताव मंजूर केल्यानंतरच हे दर वाढविण्यात येणार आहे.