मात्र स्वर्ग असले तर नरक असणारच. अमेरिकेच्या मिशिगन राज्यात एक अशी जागा आहे ज्याला पृथ्वीवरील नरक असे नाव आहे. होय, या गावाचे नावच हेल म्हणजे नरक असे आहे. अर्थात इथेही लोक राहतात. या शहरात वर्षातले सात महिने हिमपात होतो. त्यामुळे अनेकदा नागरिकांना घरातच बंदिवान होऊन राहावे लागते.
एकदा दोन जर्मन माणसे येथे आली तेव्हा सुंदर ऊन पडले होते ते पाहून एकाने सो स्कोन हेल असे उद्गार काढले. याचा अर्थ होता किती सुखद ऊन. पण ऐकणार्याने फक्त हेल ऐकले आणि तेव्हापासून गावाचे नाव हेल पडले. दुसरी कथा अशी की जेव्हा मिशिगनला राज्याचा दर्जा मिळाला तेव्हा जॉर्ज रिव्हज यांना या गावाचे नाव काय ठेवावे असे विचारले गेले.
तेव्हा येथे डास, दाट जंगल, दलदल अशी अत्यंत वाईट परिस्थिती होती. जॉर्ज यांनी गावाचे नाव काहीही ठेवले तरी काय फरक पडणार अगदी हेल ठेवले तरी चालेल असे म्हटल्यावर खरोखरच गावाचे नाव हेल झाले.