७०० वर्षांच्या वृक्षाला वाचवण्यासाठी लावले सलाईन

गुरूवार, 19 एप्रिल 2018 (16:32 IST)

तेलंगणातील  मेहबुबनगर येथील पिल्लालामर्री भागातील  ७०० वर्षांच्या वृक्षाला वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जगातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा वृक्ष आहे.  या  वृक्षाला वनस्पतींसाठीची केमिकल औषधे सलाईनच्या माध्यमातून झाडाला दिली जात आहेत.  गेल्या काही महिन्यांपासून झाडाला किड लागल्याने ते कमकुवत झाले होते. ही किड नष्ट करण्यासाठी किटकनाशके झाडामध्ये सोडली जात आहेत. त्यासाठी शेकडो सलाईनच्या बाटल्या झाडाला टांगल्या आहेत. 

जगातील मोठ्या वृक्षांपैकी एक असलेल्या या वृक्षाला किड लागल्याने कमकुवत झाले आहे. त्यामुळे डिसेंबरपासून त्याला पाहण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. किड लागल्याने त्याच्या फांद्या तुटायला लागल्या आहेत. कोणती दुर्घटना घडू नये यासाठी पर्यटकांना वृक्षाच्या परिसरात फिरण्यास बंदी घातली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती