सर्च इंजिन गुगलचा आज वाढदिवस, 20 वर्षांत प्रत्येकाच्या हृदयात

गुरूवार, 27 सप्टेंबर 2018 (09:05 IST)
गुगल सर्च इंजिन हे नेटक-यांचे सर्वांचे लाडके शोध साधन आहे. आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग असलेल्या सर्च इंजिन गुगलचा आज वाढदिवस आहे. गुगलचा आज 20वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने गुगल खास डुडलही तयार केले आहे. मेन्लो पार्कमधील सुसान वोजसिकी गॅरेजमध्ये लॅरी पेज व सर्जेई ब्रिन यांनी 27 सप्टेंबर 1998मध्ये लावलेल्या छोट्याशा गुगलच्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे. गुगल हे नाव Googolया मूळ इंग्रजी नावावरून आले आहे. एकावर शंभर शून्य ह्या मोठ्या संख्येचे Googolहे नाव आहे. 
 
गुगलचं नामकरण एका चुकीच्या स्पेलिंगमुळे झाली, गुगलचं स्पेलिंग 'Google'असं आहे पण खरं तर ते 'Googol’असं ठेवायचं होतं. पेज आणि ब्रेन यांनी सुरुवातीला गुगलचं नाव ‘बॅकरब’असं ठेवलं होतं, मात्र त्यानंतर गुगल असं नाव करण्यात आले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती