चुकीचा हेअरकट केल्यामुळे सलूनला 2 कोटींची भरपाई द्यावी लागली

शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (15:01 IST)
अनेकदा सलून किंवा पॉर्लरमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे हेअरकट केला जात नाही. अशावेळी मनस्ताप झेलावा लागतो पण अलीकडे देशात एक घटना अशी घडली आहे, जिथं सलूनला चुकीच्या पद्धतीनं केस कापण्यासाठी तब्बल 2 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागली आहे. राष्ट्रीय उपभोक्ता विवाद निवारण आयोग (NCDRC) यांच्याकडून चुकीच्या पद्धतीनं केस कापणाऱ्या सलूनला 2 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यास बजावलं आहे. वास्तविक, ही भरपाई चुकीच्या पद्धतीने महिलेचे केस कापून आणि केसांवर चुकीचे उपचार देऊन केसांना कायमचे नुकसान केल्याच्या बदल्यात देण्यास सांगितले आहे.
 
रिपोर्टनुसार, हा सलून दिल्लीतील एका हॉटेलमध्ये स्थित आहे. एप्रिल 2018 मध्ये आशना रॉय त्यांच्या केसांच्या उपचारासाठी गेली होती. त्या 'हेअर प्रॉडक्ट्स'ची मॉडेल होत्या आणि त्यांनी अनेक मोठ्या 'हेअर-केअर ब्रँड' साठी मॉडेलिंग केली होती. परंतु सलूनने त्याच्या सूचनांच्या विपरीत केस कापल्यामुळे त्यांना त्यांचे काम गमवावे लागले आणि आर्थिक नुकसानही सहन करावा लागला, ज्यामुळे तिची जीवनशैलीच बदलली नाही तर त्यांचे टॉप मॉडेल बनण्याचे स्वप्नही भंगले.
 
आशना रॉय यांनी म्हटले की मी सलूनला स्पष्टपणे सांगितले होते की समोरून लांब फ्लिक्स आणि मागून चार इंच कापा. पण हेयरड्रेसरने स्वेच्छेने फक्त चार इंच केस सोडून तिचे लांब केस कापले. मॉडेलनं ज्यावेळी सदर प्रकरणी तक्रार केली तेव्हा तिनं फ्री हेअर ट्रीटमेंटचा उल्लेख केला. 
 
आशनाचा दावा आहे की या काळात केमिकलमुळे तिच्या केसांना कायमचे नुकसान झाले आहे. हे संपूर्ण प्रकरण आशनानं राष्ट्रीय उपभोक्ता विवाद निवारण आयोग (NCDRC)  यांच्याकडे नेलं आणि तीन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली. पण, सध्या तरी तिला 2 कोटी रुपयांचीच नुकसान भरपाई देण्याचे निर्देश आयोगानं दिले आहेत. येत्या दोन महिन्यात ही रक्कम आशनापर्यंत पोहोचणं अपेक्षित असेल.

photo: symbolic

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती