जगातील सर्वात महागडा मसाला 'रेड गोल्ड', किंमत जाणून घ्या

रविवार, 17 एप्रिल 2022 (15:41 IST)
जगात एकापेक्षा जास्त खाद्य मसाले आढळतात. जे त्यांच्या चवीसाठी ओळखले जातात, परंतु एक मसाला देखील आहे, जो त्याच्या किंमतीमुळे ओळखला जातो. या कारणास्तव याला जगातील सर्वात महाग मसाला म्हटले जाते. या मसाल्याच्या वनस्पतीला जगातील सर्वात महाग वनस्पती देखील म्हटले जाते. ते वाढवणाऱ्या प्रमुख देशांमध्ये भारत, फ्रान्स, स्पेन, इराण, इटली, ग्रीस, जर्मनी, जपान, रशिया, ऑस्ट्रिया, तुर्कस्तान, चीन, पाकिस्तान आणि स्वित्झर्लंड यांचा समावेश आहे. भारतात, जम्मूमधील किश्तवाड आणि जन्नत-ए-काश्मीरच्या पंपूर (पंपोर) च्या मर्यादित भागात त्याची जास्त लागवड केली जाते. 
 
जगातील या सर्वात महागड्या मसाल्याचे नाव केशर आहे, ज्याला इंग्रजीत Saffron म्हणतात. बाजारात केशराची किंमत अडीच ते तीन लाख रुपये प्रतिकिलो आहे. केशराची किंमत जास्त असण्याचे कारण म्हणजे त्याच्या दीड लाख फुलांपासून सुमारे एक किलो कोरडे केशर बनवता येते. केशरला 'रेड गोल्ड' असेही म्हणतात कारण ते सोन्यासारखे महाग असते. असे मानले जाते की, सुमारे 2300 वर्षांपूर्वी, अलेक्झांडर द ग्रेटच्या सैन्याने ग्रीसमध्ये प्रथम लागवड केली होती. इजिप्तची रहस्यमय राणी म्हणून ओळखल्या जाणार्‍या क्लियोपेट्रानेही केशराचा वापर तिच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी केला होता, अशी आख्यायिका आहे.  
 
जरी काही लोकांचा असा विश्वास आहे की केशरचा उगम स्पेन या दक्षिण युरोपमधील देश आहे. आज, स्पेन हा जगातील सर्वात मोठा केशर उत्पादक देश आहे. भगव्या फुलांचा सुगंध इतका तीव्र असतो की आजूबाजूचा अक्खा परिसर ह्याच्या सुगंधाने दरवळतो. हे जाणून आश्चर्य वाटेल की प्रत्येक फुलामध्ये फक्त 3 केशर आढळते. केशरचा वापर आयुर्वेदिक औषधीमध्ये , खाद्यपदार्थ आणि देवपूजेमध्ये केला जात असला तरी आता पान मसाला आणि गुटख्यामध्येही त्याचा वापर केला जात आहे. केशर हे रक्त शुद्ध करणारे, कमी रक्तदाब बरे करण्यात आणि कफ नाशक  देखील मानले जाते. या कारणास्तव, औषधापासून ते आयुर्वेदिक वनस्पतींपर्यंत वापरले जाते.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती