‘शक्तिमान’ आणि ‘गंगाधर’ या दोन्ही भूमिका साकारणाऱ्या मुकेश खन्नाने सर्वांची मनं जिंकली होती. ‘कानून का दोस्त, मुर्जिमों का दुश्मन,’ हे शक्तिमानचे तर ‘अंधेरा कायम रहे,’ हे किल्विश या खलनायकाचे संवाद तुफान गाजले. मालिकेच्या शेवटी येणाऱ्या ‘छोटी छोटी मगर मोटी बातें’ यातून दिला जाणारा सामाजिक संदेश आणि ‘सॉरी शक्तिमान’ हा माफी मागतानाचा शब्द अनेकांच्या आठवणीत आहेत.