"मला शिवाजी व्हायचंय" या व्याख्यानाने होणार तरुणाईचा जागर

शनिवार, 4 ऑगस्ट 2018 (14:13 IST)
मालाड नववर्ष स्वागत समिती आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. दर महिन्यातील एका रविवारी विविध विषयांवरील व्याख्यानाचे आयोजन केले आहे. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प रविवार दि. १२ ऑगस्ट २०१८ रोजी संध्या ७ वा. श्रीराम मंदिर, सोमवार बाजार, मालाड पश्चिम येथे सादर होणार आहे. "मला शिवाजी व्हायचंय" या विषयावर श्री. विनोद मेस्त्री व्याख्यान सादर करतील. व्याख्यानमाला विनामूल्य असणार आहे.
 
विनोद मेस्त्री तरुणांमध्ये अत्यंत प्रसिद्ध असल्यामुळे हे व्याख्यान म्हणजे तरुणाईचा जागरच असणार आहे. प्रत्येकाला शिवाजी व्हायचं असतं म्हणजेच आपापल्या क्षेत्रात जोमाने काम करुन यश मिळवायचं असतं. ते कसं मिळवायचं? आणि यासाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांकडून काय शिकता येईल? याबाबत श्री. विनोद मेस्त्री प्रबोधन करतील. तसेच तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क: जयेश शत्रुघ्न मेस्त्री - ९९६७७९६२५४. 
 
पुढील व्याख्यांनांचे तपशील.
आजच्या संदर्भात शिव-शंभू, वक्ता - ऍड. चेतन बारसकर - ९ सप्टेंबर २०१८, संध्या ७ वा.
समर्थ रामदास, वक्ता - तुकाराम चिंचणीकर - १४ ऑक्टोबर २०१८, संध्या ७ वा.
अफझलखान वध, वक्ता - अप्पा परब - ४ नोव्हेंबर २०१८, संध्या ७ वा.
राज्याचे सार ते दुर्ग, वक्ता - मिलिंद पाराडकर - १६ डिसेंबर २०१८, संध्या ७ वा. 
स्थळ: श्रीराम मंदिर, सोमवार बाजार, मालाड पश्चिम. मुंबई - ६४.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती