कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष यांनी त्यांच्या २०५ एकर माळरान जमीनित केली बांबूची लागवड

शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018 (10:33 IST)
लातूर येथे राज्यमंत्री कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी त्यांच्या २०५ एकर माळरान जमीनित बांबूची लागवड केली. कमी पाण्यात बांबुची लागवड ऊसापेक्षाही परवड्ते असं पाशा पटेल म्हणतात.बांबूच्या लागवडीमुळे वनक्षेत्र वाढते तसेच या माध्यमातून शेतकर्‍यांना शाश्‍वत उत्पन्न मिळू शकते. बांबूपासून अनेक वस्तू तयार करता येत असल्याने रोजगारही मिळतो. मराठवाड्यात आता बांबूची लागवड सुरू झाली असून या माध्यमातून आगामी कांही वर्षात मराठवाड्याचे चित्र पालटणार असल्याचे मत महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे कार्यकारी संचालक थंगम साईकुमार रेड्डी यांनी व्यक्त केले.
 
फिनिक्स फाऊंडेशन संस्था लातूर व महाराष्ट्र वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने लोदगा येथे ङ्गिनिक्स फाऊंडेशनच्या जागेत ५१ हजार बांबूच्या झाडांचे रोपण मंगळवारी (दि. ३१) करण्यात आले. वृक्षारोपणानंतर आयोजित कार्यक्रमात रेड्डी बोलत होते. महाराष्ट्र राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास विभागीय वन अधिकारी आर. के. सातेलीकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, उस्मानाबादचे सहाय्यक वन संरक्षक आर. जी. मुद्दमवार, गटशेतीचे प्रणेते डॉ. भगवान कापसे, अमृत पॅर्टनचे जनक अमृतराव देशमुख, प्रयोगशील शेतकरी राजशेखर पाटील, कृषीमुल्य आयोगाचे सदस्य अचुत गंगणे, उपविभागीय अधिकारी चाऊस यांची उपस्थिती होती. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती