देशात सर्वाधिक उत्पन्न असणाऱ्या आमदारांची यादी जाहीर झाली आहे. यात एकूण ३१४५ आमदारांमध्ये सर्वात जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या पहिल्या २० आमदारांमध्ये महाराष्ट्रातील 4 आमदारांनी स्थान मिळवले आहे. उद्योगपती आणि भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांचं वार्षिक उत्पन्न ३४.६६ कोटी असून त्यांनी व्यवसाय म्हणून नोकरी दाखवली आहे. ते या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं वार्षिक उत्पन्न ४.५६ कोटी असून त्यांचा व्यवसाय शेती आहे. ते या यादीत शेवटच्या म्हणजे विसाव्या क्रमांकावर आहेत. सोलापूर जिल्ह्यातील दिलीप सोपल हे या यादीत सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांचं वार्षिक उत्पन्न ९.८५ कोटी आहे. पनवेलचे प्रशांत ठाकूर यांचं वार्षिक उत्पन्न- ५.६१ कोटी आहे, ते या यादीत १७ व्या स्थानी आहेत. या यादीत कर्नाटक पहिल्या तर महाराष्ट्र या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.