गुरुदेव श्री श्री रवि शंकर यांच्या बहिणीकडून सहज ध्यान शिका

भारत भरात 4 ते 6 मे पर्यंत आयोजित होणार्‍या सहज समाधी ध्यानात किमान हजारोने लोकांची श्रीमती भानुमती नरसिम्हनकडून सहज समाधी ध्यान शिकण्याची उमेद आहे. श्रीमती भानुमती नरसिम्हन, पूज्य गुरुदेव श्री श्री रवि शंकर यांची बहीण आणि “गुरुदेव –ऑन द प्लाटू ऑफ़ द पीक”नावाच्या बेस्टसेलिंग पुस्तकाची लेखिका देखील आहे.  
 
3,000 पेक्षा जास्त प्रकाशित वैज्ञानिक पत्रांच्या अध्ययनातून असे सिद्ध झाले आहे की, ध्यानाचे लाभ आज सामान्य ज्ञान बनत आहे. नियमित सहज समाधी ध्यानाच्या अभ्यासामुळे –विचारांमध्ये स्पष्टता, ऊर्जेत वाढ, चांगले आरोग्य, संबंधांमध्ये लवचीकता आणि मनाला अधिक शांती मिळते. 
 
मागच्या ऑक्टोबरमध्ये विश्व मनोचिकित्सा एसोसिएशनच्या वार्षिक संमेलनात, सहज समाधी ध्यानाच्या नियमित अभ्यासामुळे हृदय रोग, तंत्रिका तंत्र आणि ​​अवसादावर होणार्‍या प्रभावांवर प्रकाशित एका अध्ययनाने सर्वश्रेष्ठ शोधाचा पुरस्कार प्राप्त केला.   
सहज समाधी कार्यक्रम, ध्यानाचा अभ्यास करण्याची सोपी पद्धत शिकवते. 14 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीला ध्यान करणे शिकवू शकतो. प्रतिभागीला मानसिक रूपेण एक साधारण ध्वनीचा उपयोग करणे शिकवले जाते जे मनाला व्यवस्थित करण्याची मदत करतो. जसे मन ध्यानाच्या खोलात उतरतो, तणाव गायब होतो, निर्णय घेण्यात स्पष्टता येते आणि लोकांना जीवनात अधिक आनंदाची प्राप्ती होते.  
 
श्रीमती भानुमती नरसिम्हन वेगळ्या तंत्राच्या फायद्यांबद्दल सांगताना म्हणतात, "ध्यान तुमच्या पूर्ण दिवसाला ऊर्जावान आणि उत्पादक बनवण्यात मदत करतो. यामुळे तुमच्या चेहर्‍यावर एक असे स्मित येते ज्याला कोणी चोरू शकत नाही.”

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती