उत्तर प्रदेशातील भदोहीमध्ये आकाशातून माशांचा 'पाऊस', पाहण्यासाठी गर्दी जमली

मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (15:50 IST)
उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यात आकाशातून पावसाच्या पाण्याबरोबर शेकडो मासेही पडले. रस्त्यावर मासे पाहून लोकांना आश्चर्य वाटले. थोड्याच वेळात लोकांची गर्दी मासे पाहण्यासाठी जमली. हे प्रकरण भदोहीच्या चौरी भागातील कंधीया जवळ आहे. पावसा च्या, पाण्याबरोबर मासे पडू लागताच लोक ते पाहून आश्चर्यचकित झाले. तथापि, तज्ञांनी ही एक सामान्य घटना मानली आहे. हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कधीकधी अशा घटना परिसरात चक्रीवादळ हवेसह कमी दाबाच्या निर्मितीमुळे घडतात.
 
पावसाच्या पाण्यासह एक -दोन नव्हे तर शेकडो लहान मासे पावसादरम्यान पडले. मासे पाहण्यासाठी लोक जमले. गावकऱ्यांनी हे मासे उचलले आणि तळ्यात आणि जवळच्या खड्ड्यांमध्ये टाकले, जिथे पाणी भरले होते. एका गावकऱ्याने सांगितले की मासे पडताना पाहून सर्व लोक आश्चर्यचकित झाले. त्याने सांगितले की 50 किलो पर्यंत मासे आकाशातून पडले होते, जे गोळा करून खड्डे आणि तलावांमध्ये सोडले गेले.
मासे आकाशातून पडत आहे हे बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली.कोणी छतावर कोणी शेतात मासे गोळ्या करण्यासाठी धावत गेले. ग्रामस्थांनी तब्बल 50 किलो पेक्षा अधिक मासे एकत्र करून तलावात सोडले.हे मासे साधारण मासे पेक्षा काही वेगळ्या असल्याचे सांगितले जात आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती