भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या एका ट्विटमुळे क्रिकेटपटू हार्दीक पांड्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. अनुसुचित जाती, जमातींसाठीच्या विशेष न्यायालयाने पांड्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून, कोण बाबासाहेब आंबेडकर ? ते ज्यांनी एकमेकांना छेद देणारे कायदे तयार केले, का ते ज्यांनी आरक्षण नावाचा रोग समाजात पसरवला. हे ट्वीट त्याने केले होते. राजस्थानातील डी.आर. मेघवाल यांनी न्यायालयात धाव या विरोधात धाव घेतली आहे. मेघवाल हे राजस्थानातील राष्ट्रीय भीम आर्मीचे सदस्य असून त्यांनी मंगळवारी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये त्यांनी म्हटलं होतं की पांड्याच्या ट्विटमुळे बहुजन, मागासवर्गीय आणि देशाच्या संविधानाचा अपमान झाला आहे. मेघवाल यांनी म्हटलंय की जानेवारी महिन्यात त्यांनी या ट्विटबद्दल ऐकलं. हे ट्विट बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान व्यक्तीची बदनामी करणारे आहे. असे ट्विट करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आहे.