सेहवागचे ‘एक तीर से दो निशाणा’वाले ट्विट व्हायरल

मंगळवार, 20 मार्च 2018 (09:20 IST)
नेहमीच हटके ट्विटस, शुभेच्छा आणि शाब्दिक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सेहवागने सामना जिंकल्यानंतर एक मजेदार फोटो ट्विट केला आहे. अंतिम सामन्यात शेवटच्या दोन षटकांमध्ये ३४ धावा करायचा असल्या तरी आम्हाला (भारतीय संघाला) काही फरक पडत नाही अशा अर्थाचे ट्विट केले आहे. या ट्विटबरोबर त्याने तन्नू वेड्स मन्नू रिटर्सन सिनेमातील जीमी शेरगीलच्या तोंडचा एक संवाद त्याच सिनेमातील पात्राच्या फोटोसहीत ट्विट केला आहे. या फोटोवर 'हमको घंटा फरक नाही पडता' असे वाक्य लिहीलेले आहे. 
 
या ट्विटमध्ये सेहवागने #DineshKarthik हा हॅशटॅग वापरला आहे. म्हणजेच १२ चेंडूत ३४ धावा करायच्या असल्या तरी दिनेश कार्तिक सारख्या खेळाडूला या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही किंवा त्याचा दबाव त्याच्यावर नसतो असेच सेहवागला या ट्विटमधून सांगायचे आहे. आणि या अशा ‘ठग’ ट्विटच्या माध्यमातून एकीकडे दिनेश कार्तिकची स्तुती करताना दुसरीकडे बांगलादेश संघाला सेहवागने त्यांची जागा दाखवून दिल्याची भावना चाहत्यांनी या ट्विटखालील कमेन्टमध्ये व्यक्त केली आहे. म्हणूनच सेहवागचे ‘एक तीर से दो निशाणा’वाले ट्विट व्हायरल झाले आहे.  हे ट्विट नेटकऱ्यांना भलतेच आवडले असून ते साडेअकरा हजाराहून अधिक जणांनी रिट्वीट केले असून ६२ हजारहून अधिक जाणांनी हे ट्विट लाईक केले आहे. तर या ट्विटवर दोन हजारहून अधिक जणांनी कमेन्ट केली आहे.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती