आता कारण जाणून घ्या
गीता यथार्थ भारतीय माहिती आणि प्रसारण खात्यात कार्यरत आहे. त्या सिंगल पेरेंट आहेत. त्यांनी टॉयलेटचं दार अर्ध उघड ठेवत कमोडवर बसलेला फोटो शेअर करत लिहिले आहे की 'मी टॉयलेटचं दार शेवटी कधी बंद केलं होता, मला आठवत नाही. आता तर अशी परिस्थिती आहे, की ऑफिसमध्येही टॉयलेटचं दार बंद करणं लक्षात राहत नाही. आणि आता मुलाने फोटो काढणे शिकून घेतले आहे. लाइफ ऑफ द सिंगल मदर. पुढं त्यांनी लिहिलं आहे, 'मदरहूड हा सोपा जॉब नाही, दैवीय पण नाही. म्हणून त्याचं उदात्तीकरण थांबवा.'