ऍलन नंतर फरहान अख्तर ने देखील Facebookला केला बाय बाय

मंगळवार, 27 मार्च 2018 (15:24 IST)
Facebookचा डाटा लीक झाल्याबद्दल लोकांना फेसबुकच्या प्रायवसीबद्दल संदेह होऊ लागला आहे. यानंतर एक एक करून बरेच मोठे लोक फेसबुकला बाय बाय करत आहे. या कडीत बॉलीवूड स्टार फरहान अख्तर ने देखील फेसबुक सोडले आहे. याची माहिती त्याने ट्विट करून दिली आहे. सांगायचे म्हणजे या अगोदर स्पेसएक्स आणि टेस्लाचे सीईओ ऍलन मस्कने देखील आपले फेसबुक पेज डिलीट केले आहे.  
 
फरहान अख्तरने ट्विट करून याची माहिती दिली आणि म्हटले, 'गुड मॉर्निंग, तुम्हाला सूचित करतो की मी आपला फेसबुक अकाउंट नेहमीसाठी डिलीट केला आहे, पण अद्यापही वेरिफाइड FarhanAkhtarLive पेज अॅक्टिव्ह आहे.'
 
सांगायचे म्हणजे की सर्वात आधी #DeleteFacebook कँपेनची सुरुवात व्हाट्सऐपचे को-फाउंडर ब्रायन एक्टनने केली होती. तसेच अमेरिकन सिंगर Cherने देखील आपल्या फेसबुक पानाला डिलिट केले आहे.  
 
महत्त्वाचे म्हणजे डाटा लीक झाल्यानंतर फेसबुकची समस्या जास्त वाढली आहे. बर्‍याच मोठ्या कंपन्यांनी फेसबुकला जाहिरात देणे आणि घेणे देखील बंद केले आहे. तसेच मार्क जुकरबर्गने यासाठी आधी फेसबुकर माफी मागितली आणि नंतर वृत्तपत्रात जाहिरात देऊन माफी मागितली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती