Fact Check : ASPIDOSPERMA Q होमिओपॅथीमुळे ऑक्सिजनची पातळी वाढते, थेट तज्ञांकडून जाणून घ्या

बुधवार, 28 एप्रिल 2021 (18:39 IST)
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशात सोशल मीडियावर अनेक प्रकाराच्या पोस्ट व्हायरल होत आहे ज्यात कोरोनापासून बचावासाठी टिप्स देण्यात येत आहे. हा उपक्रम चांगल्या कामासाठी आहे, परंतु अशा कठीण परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेणे, कोणत्याही संशोधनाशिवाय उपचार करणे आणि स्वत: ची औषधे घेणे महागात पडू शकतं.
 
सोशल मीडियावर होमिओपॅथीचं एक औषधाची पोस्ट व्हायरल होत आहे ज्याने ऑक्सिजन लेवल वाढतं असा दावा केला जात आहे. जाणून घ्या हे सत्य आहे वा नाही- 
 
व्हायरल पोस्ट - 
जर ऑक्सिजनची पातळी कमी होत असेल तर ऑक्सिजनची वाट पाहू नका. ASPIDOSPERMA Q 20 थंब एक कप पाण्यात मिसळून दिल्याने ऑक्सिजनची पातली लगेच वाढते आणि मेंटेन राहते. हे होमिओपॅथिक औषध आहे.
व्हायरल पोस्ट बरोबर आहे का?
 
वेबदुनियाने डॉ एके द्विवेदी, सदस्य, आयुष मंत्रालय यांच्याशी चर्चा केली तर त्यांनी म्हटलं की या औषधाबरोबरच कार्बो वेज देखील दिले जात आहे, बर्‍याच लोकांना फरक पडला आहे. जर ऑक्सीजन सेचुरेशन लेवल काही प्वाइंट्स कमी असेल तर मेंटेन होऊ शकतं परंतू त्रास जास्त असल्यास ऑक्सिजन सपोर्टची गरज भासते.’
 
डॉ सरिता जैन, एम डी, लेक्चरर, गुजराती होमियो मेडिकल कॉलेज, यांनी सांगितले की ‘ऑक्सिजन लेवल तात्पुरतं तर वाढतं परंतू मेंटेन राहतं हे सत्य नाही. कारण यासोबत आपल्याला कार्बो वेज देखील घ्यावी लागेल. ऑक्सिजनची पातळी वाढविण्यात ती मदत करते. आज, 85 पॉईंटपेक्षा कमी असल्यास ऑक्सिजन सपोर्ट सिस्टम आवश्यक आहे. जर आपली ऑक्सिजन पातळी 90 च्या वर असेल तर ते कार्य करते परंतु यापेक्षा कमी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. ज्या प्रकारे लँग्समध्ये संसर्ग पसरत आहे, रिस्क घेणे धोकादायक सिद्ध होऊ शकतं.
 
काय करावे?
जरी सोशल मीडियावर व्हायरल पोस्ट योग्य असेल तरी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आजच्या काळात कोणत्याही प्रकारची औषधे घेऊ नका. आपल्या शरीराच्या प्रकार आणि लक्षणांनुसार औषधे दिली जातात. होमिओपॅथी औषध रोगाची लक्षणे समजल्यानंतर देण्यात येते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती