परदेशी गायींचे दूध महिलांनी फिगर गमावली: नेत्याचं वादग्रस्त विधान

गुरूवार, 25 मार्च 2021 (14:43 IST)
तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार प्रचार सुरू असताना नेत्यांची जीभ घसरत आहे. प्रचान दरम्यान नेत्याच्या विधानामुळे अनेकदा वाद निर्माण होतो. 
 
प्रचार दरम्यानच द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे नेते द्रमुकचे नेते दिंडिगल लिओनी यांनी केलेलं एक विधान वादाचा विषय ठरत आहे. द्रमुकच्या नेत्याने महिलांबद्दल गंभीर विधान करत म्हटले की हल्ली परदेशी गायींचं दूध पित असल्यामुळे आपल्याकडच्या बायकांनी फिगर गमावले आहेत. त्या आता जाड होत आहे. त्यांच्या या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे.
 
दिंडीगल लिओनी हे कोइम्बतूरमध्ये पक्षाचे उमेदवार कार्तिकेय सिवसेनापती यांच्यासाठी प्रचार करत होते. प्रचार दरम्यान लिओनी म्हणाले, “अनेक प्रकारच्या गायी असतात व हल्ली शेतामध्ये परदेशी प्रजातीच्या गायी दिसतील. या गायींचं दूध काढायण्यासाठी मशिन वापरतात. ज्याने दिवसाला ४० लिटर दूध मिळतं. ते दूध प्यायल्यामुळे आपल्याकडच्या महिला फुग्याप्रमाणे जाड झाल्या आहे. आधी स्त्रियांचे फिगर आठ आकड्यासारखं असून त्या मुलांना कंबरेवर ठेवून फिरत होत्या पण आता असे केल्यास मुलं देखील घसरून पडतील. कारण महिला आता परदेशी गायींचं दूध पिऊन बॅरलसारख्या झाल्या आहेत. आपली मुलं देखील जाड झाली आहेत”, असं ते म्हणाले.
 
त्यांचे हे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर महिलांद्वारा त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या पूर्वी पश्चिम बंगालचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी “पाय दाखवायचाच असेल तर ममता दीदींनी साडीऐवजी बर्मुडा घालावा म्हणजे त्यांचा पाय व्यवस्थित दिसेल”, असं वादग्रस्त विधान केलं होतं. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती