कुवैत सिटीच्या एका कोर्टात लग्नासाठी वर- वधू आले होते. या दरम्यान वधू घसरून पडली. घसरल्यानंतर नवर्यामुलाने तिला स्टूपिड (मूर्ख) म्हटलं. ही गोष्ट मुलीला पसंत पडली नाही आणि नाराज होऊन तिने लग्नाच्या तिसर्या मिनिटाला घटस्फोट दिला. ज्या कोर्टात लग्नासाठी पोहचले होते तेथून तीन मिनिटात घटस्फोट घेऊन बाहेर पडले. सूत्रांप्रमाणे दोघांनी जजसमोर लग्नाच्या कागदावर सही केली होती.