भय्यूजी महाराजांची पत्नी आणि मुलगी यांची डीआयजींकडे तक्रार

मंगळवार, 18 डिसेंबर 2018 (16:32 IST)
भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणात आता त्यांची पत्नी आणि मुलगी दोघांनीही डीआयजींकडे तक्रार करत संशयित सेवक आणि इतर काही लोकांवर कारवाईची मागणी केली आहे. दोघांनी त्या ड्राइव्हरचा जबाब कलम 164 च्या अंतर्गत नोंदवण्याची मागणी केली आहे. एक युवती आणि दोन सेवकांवर ब्लॅकमेलींगचा आरोप केला आहे. ज्या लोकांवर संशय आहे अशा व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलं आहे. भय्यू महाराज यांनी घरगुती वादामुळे नाही तर पैसे, फ्लॅट आणि गाडीसाठी ब्लॅकमेलींग होत असल्याने आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.'
 
'पोलिसांच्या ताब्यात असलेला आधीचा ड्राइव्हर कैलाश पाटीलला या सगळ्या षड्यंत्रांची माहिती होती. त्याने सेवक विनायक, शरद देशमुख आणि एका युवतीने रचलेल्या षडयंत्राबाबत जबाब नोंदवला आहे. त्यामुळे त्याचा जबाब कलम 164 च्या अंतर्गत नोंदवण्यात यावा. अशी मागणी करण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती