Whatsapp वर चेक करू शकता PNR स्टेटस, या नंबर वर करा मेसेज

शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018 (12:52 IST)
काही दिवसांपर्यंत ट्रेनचे लाइव्ह स्टेटस किंवा तुमचे पीएनआर नंबर चेक करणे फारच अवघड काम होते. यासाठी प्रवाशांना रेल्वे इंक्वायरीचा नंबर 139 वर कॉल करावा लागत होता नाहीतर IRCTC ची आधिकारिक वेबसाइट irctc.co.in वर लॉग इन करून आपला पीएनआर नंबर चेक करावा लागत होता. पण ह्या प्रोसेसमध्ये फार वेळ लागायचा.  
 
आता भारतीय रेल्वेने नुकतेच ह्या पूर्ण प्रोसेसला सोपे बनवण्यासाठी ऑनलाईन ट्रॅव्हल वेबसाइट make my trip सोबत भागीदारी केली आहे. रिपोर्टनुसार, आता प्रवाशांना त्यांच्या स्मार्टफोनवरच ट्रेनचा लाइव्ह स्टेटस, पीएनआर स्टेटस इत्यादीची माहिती मिळून जाईल. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर पीएनआर नंबर किंवा ट्रेनचे लाइव्ह स्टेटस या प्रकारे चेक करू शकता :  
 
1- सर्वात आधी आपल्या स्मार्टफोनचा डायलरला उघडा.  
 
2- आता येथे 7349389104 (व्हाट्सएपवर मेकमायट्रिपचा नंबर) सेव्ह करा.   
 
3- आता व्हाट्सएपला ओपन करा आणि त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्टला रिफ्रेश करा.  
 
4- आता या नंबरला ओपन करून त्यावर तुम्हाला एक मेसेज पाठवावा लागेल.
  
5- तुम्हाला व्हाट्सएप नंबरवर पीएनआर नंबर किंवा ट्रेनचे लाइव्ह स्टेटस जाणून घेण्यासाठी आपल्या ट्रेनचा नंबर लिहून पाठवावा लागेल.  
 
6- यानंतर तुम्हाला ट्रेनचा रिअल टाइम स्टेटस आणि पीएनआर नंबर पाठवण्यात येईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती