उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकताच त्यांचा 'आज मैंने मूड बना लिया ए ए ए , तेरे नाल ही नचना वे' या त्यांच्या गाण्यावर डान्स करत एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांच्या या गाण्याला लोकांकडून मोठी पसंती मिळत आहे. या गाण्याच्या प्रमोशन साठी आता त्यांनी समाजमाध्यमांवर सर्वाना एक आवाहन केले आहे. तुमच्याकडे काय आहे ते आम्हाला दाखवा! असं अमृता फडणवीस यांनी आपल्या चाहत्यांना एक चॅलेंज दिले आहे.