शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री दादा भुसे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडिओ शेअर करत प्रश्न उपस्थित केला आहे. आता, दादा भुसेंनी व्हिडिओबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
मालेगाव येथील शिवपुराण कथेच्या कार्यक्रमाचा आयोजन २३ डिसेंबरपासून सुरू आहे. दररोज २ ते ३ लाख भाविक येतात, अंदाजे ७५ ते ८० टक्के महिला भगिनी या कथेचं श्रवण करतात. त्या कार्यक्रमस्थळी या दोघांनी अतिशय चुकीचं कृत्य केलं होतं, जे की समाजातील नागरिक त्याच समर्थन करु शकत नाही. त्यावेळी, तिथे मोठा मॉबही जमला होता. मग, मी पोलिसांना संबंधितांवर कारवाईचे आदेशही दिले आहेत. मी त्या क्षणाला तसं केलं नसतं तर, त्या मॉबच्या भावना तीव्र होत्या, खूप मोठा प्रसंग तिथे निर्माण झाला असता. मात्र, किरकोळ घटनेतून आम्ही तो प्रसंग मार्गी लावला आहे, असे स्पष्टीकरण दादा भुसे यांनी दिले. तसेच, जितेंद्र आव्हाड यांनी माहिती घ्यावी, माहिती घेतल्यानंतर तेही सर्वकाही मान्य करतील, असे भुसे यांनी म्हटलं आहे. दादा भुसेंनी व्हिडिओबाबत दिले असे स्पष्टीकरण
शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री दादा भुसे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडिओ शेअर करत प्रश्न उपस्थित केला आहे. आता, दादा भुसेंनी व्हिडिओबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
मालेगाव येथील शिवपुराण कथेच्या कार्यक्रमाचा आयोजन २३ डिसेंबरपासून सुरू आहे. दररोज २ ते ३ लाख भाविक येतात, अंदाजे ७५ ते ८० टक्के महिला भगिनी या कथेचं श्रवण करतात. त्या कार्यक्रमस्थळी या दोघांनी अतिशय चुकीचं कृत्य केलं होतं, जे की समाजातील नागरिक त्याच समर्थन करु शकत नाही. त्यावेळी, तिथे मोठा मॉबही जमला होता. मग, मी पोलिसांना संबंधितांवर कारवाईचे आदेशही दिले आहेत. मी त्या क्षणाला तसं केलं नसतं तर, त्या मॉबच्या भावना तीव्र होत्या, खूप मोठा प्रसंग तिथे निर्माण झाला असता. मात्र, किरकोळ घटनेतून आम्ही तो प्रसंग मार्गी लावला आहे, असे स्पष्टीकरण दादा भुसे यांनी दिले. तसेच, जितेंद्र आव्हाड यांनी माहिती घ्यावी, माहिती घेतल्यानंतर तेही सर्वकाही मान्य करतील, असे भुसे यांनी म्हटलं आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor