कर्करोगावर नव्याने विकसित करण्यात आलेली लस उपयोगी

मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018 (17:45 IST)
कर्करोगातील एचईआर २ पॉझिटिव्ह प्रकारच्या कर्करोगात नव्याने विकसित करण्यात आलेली लस उपयोगी असल्याचे सिद्ध झाले आहे. रिसेप्टर एचईआर २ मुळे यात कर्करोगाची वाढ होत असून शरीराच्या नवीन भागात कर्करोगाच्या पेशी पसरतात. यात ज्या रुग्णांना लस दिली होती त्यांच्यापैकी ५४ टक्के रुग्णांना वैद्यकीय फायदा दिसून आला असा दावा अमेरिकेच्या राष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्थेने केला आहे. 
 
एका महिलेला अंडाशयाचा कर्करोग, आतडय़ाच्या अस्तराचा कर्करोग, आतडय़ाचा कर्करोग व पुरस्थ ग्रंथीचा कर्करोग असलेल्या रुग्णांचा यात समावेश होता. जे. ए. बेरझोफस्की यांनी सांगितले की, लशीचा वापर केल्याने एचईआर २ ला प्रतिकार केला जाऊन अनेक कर्करोगांच्या वाढीला आळा बसतो. त्यात स्तन, फुफ्फुस, आतडे व इतर अनेक कर्करोगांचा समावेश आहे. यात प्रत्येक रुग्णासाठी वेगळ्या व्यक्तिगत लशी तयार करण्यात आल्या होत्या त्यात रक्तातून घेतलेल्या प्रतिकारशक्ती पेशींमध्ये सुधारणा करून लस तयार करून ती त्वचेत टोचण्यात आली. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती