मुंबई ची जीवनवाहिनी असलेल्या मुंबई लोकलचे १ तारखेपासून पश्चिम रेल्वेकडून गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार आहे. अनेक ठिकाणी फेऱ्या वाढणार असून, सोबतच चचर्गेट-विरार लोकलचे काही थांबे कमी करण्यात आले आहेत. तर संध्याकाळच्या वेळेत विरारपर्यंत महिला विशेष लोकल चालवण्यात येईल असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. सोबतच गर्दीच्या वेळेनुसार काही गाड्यांचे मार्गही बदल केले आहेत. त्याबरोबर संध्याकाळी गर्दीच्यावेळी चर्चगेटहून सुटणारी एखादी जलद लोकल मुंबई सेंट्रलपर्यंत थांबणार नाही. जेणेकरून या वाचलेल्या वेळेचा फायदा जादा फेरीसाठी होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे अधिक सुविधेने त्यांचा कामात वेग येईल असे चित्र आहे.