पुणे: नवरीमुलगी पुढे बुलेटवर, वरात मागे, अशी पोहचली मंडपात

लाल रंगाची नऊवारी, नाकात नथ, हातात हिरव्या बांगड्या आणि डोळ्यावर काळा चष्मा लावून बुलेटवर स्वार मुलगी. हा सिनेमाचा दृश्य नव्हे तर एक शेतकर्‍याची मुलगी लग्नासाठी स्वत:ची वरात मागे घेऊन मंडपात पोहचणारी आजची नारी आहे.
 
हल्ली वेगळ्या प्रकारे लग्न करण्याची धून असल्यामुळे नवरदेव आणि नवरीमुलगी काही तरी नवीन करण्याच्या फिराकीत असतात. असेच एक अनोखे विवाह पुण्यात झाले. ज्यात नवरीमुलगी नऊवारी नेसून, नटून थाटून डोळ्यावर काळा चष्मा लावून बुलेट चालवत मंडपात पोहचली.
 
कोमल शहाजी देशमुख असे या मुलीचे नाव असून तिने 5 किमीचा रस्ता बुलेटने पार केला आणि तिच्यामागे नवरदेव आणि वराती कारने येत होते. तिच्यासोबत काही इतर लोकंदेखील बाइकने सोबत चालत होते. अनेक लोकांना मुलीची हा अंदाज खूप पटला.
 
मुलीचे वडील शेतकरी आहे. त्यांनी सांगितले की मुलीला बुलेट चालवण्याचा खूप शौक आहे आणि तिला बुलेटने स्वत:च्या लग्नाला येण्याची इच्छा देखील होते आणि तिच्या इच्छेला मान देऊन आम्ही सर्वांनी होकार दिला. अशा प्रकारे समाजाला संदेशही दिला की वरात घेऊन येण्याचा हक्क केवळ मुलाकडे आरक्षित नव्हे. तसेच मुली मुलांपेक्षा कुठल्याही बाबतीत कमतर नाही हे देखील समाजाला दाखवायचे होते.
 
लोकांनी मुलीच्या या स्टाइलचे भरभरून कौतुक केले. आणि आता ती बुलेट राणी म्हणून ओळखली जात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती