एखाद्या गुन्हेगाराने भले कितीही चलाखीने गुन्हा केला तरी एक ना एक दिवस तो चव्हाट्यावर येतोच. तुर्कीमध्ये असेच हैराण करणारे प्रकरण समोर आले आहे. तिथे हल्लीच एका व्यक्तीचा सडलेला मृतदेह तब्बल 44 वर्षानंतर आढळून आला. तो अशा ठिकाणी की, ज्याची कदाचित कुणी कल्पनाही करू शकला नसता.
1974मध्ये ग्रीस आणि तुर्की या दोन देशांतील लोकांमध्ये उसळलेल्या जातीय संघर्षात अहमद हरगुन नावाच्या एका व्यक्तीची हत्या झाली होती. मात्र त्याचा मृतदेह त्यावेळी कुठेच आढळून आला नव्हता. आता 44 वर्षानंतर एका झाड्या मुळांखाली या व्यक्तीच्या सांगाड्याचे अवशेष आढळून आले आहेत. खरे म्हणजे या व्यक्तीच्या पोटात अंजीरचे बी होते. त्यातून पुढे जाऊन एक झाड उगविले. 2011मध्ये एका संशोधकाला डोंगरावर अंजीरचे झाड दिसले. त्यानंतर त्याने त्याच्या आासपास उत्खनन सुरू केले. या उत्खननातून जे वास्तव समोर आले, त्याने सगळ्यांनाच अचंबित केले.
कारण या खोदकामादरम्यान एका व्यक्तीचे अवशेष आढळून आले. या हत्याप्रकरणाचा तपास करणार्या अधिकार्यांना असे दिसून आले की, हरगुन आणि अन्य लोकांचा मृत्यू डायनामाइटच्या स्फोटात झाला होता. या स्फोटामुळे गुहेत एक मोठा बोगदा तयार झाला होता. हरगुनने मृत्यूच्या आधी अंजीर खाल्ले होते, अशी शक्यता वर्तविली जात आहे.