आर्टिफिशियल इंटेलिजेंस सांगेल आपला मृत्यू काळ

गुरूवार, 14 नोव्हेंबर 2019 (13:11 IST)
आर्टिफिशियल इंटेलीजेंस (AI) ने मानव जीवनात एक महत्त्वाची जागा निर्माण केली आहे. अलीकडेच एका शोधात एआय स्टॅंडर्ड ईसीजी टेस्टच्या मदतीने आजारी व्यक्तीची एका वर्षाच्या आत होणार्‍या संभाव्य मृत्यूच्या कारणाचा अंदाज बांधता येऊ शकतो असे आढळले आहे.
 
पेनसिल्व्हेनियामध्ये गिसिंजर हेल्थ सिस्टमच्या शोधकर्त्यांनी हे निष्कर्ष काढण्यापूर्वी 40000 रूग्णांच्या 1.77 मिलियन ईसीजी टेस्टच्या निकालांचे विश्लेषण केले.
 
आर्टिफिशियल इंटेलीजेंसच्या न्यूरल नेटवर्क मॉडलने या या तथ्यांच्या चाचणीवर आधारित काढलेले निष्कर्ष अत्यंत हैराण करणारे आणि अचूक होते. सामान्य ईसीजी रिर्पोट असणार्‍या रुग्णांमध्ये देखील आर्टिफिशियल इंटेलीजेंस योग्य समस्या शोधण्यास यशस्वी ठरलं.
 
गिसिंजर हेल्थ सिस्टम इमेजिंग साइंस अँड इनोव्हेशन विभागाचे अध्यक्ष ब्रॅंडन फोर्नवॉल्ट यांनी सांगितले की शोध अत्यंत महत्त्वपूर्ण असून आम्हाला भविष्यात ईसीजीच्या निकालांचे स्पष्टीकरण करणे सोपे होईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती