उंदीराची शिकार करताना सापाचा व्हिडीओ व्हायरल

बुधवार, 12 ऑक्टोबर 2022 (10:23 IST)
सोशल मीडियावर असे काही व्हिडीओ येतात जे विचार करायला लावतात. काही व्हिडीओ गमतीशीर असतात तर काही चित्तथरारक असतात. असाच एक चित्तथरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून डोळ्यांना विश्वास बसणार नाही. 

अजगर जिवंत मोठ्या प्राण्यांना देखील गिळू शकतो. राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात सापा कडून उंदीराची शिकार करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. उंदराला तोंडात पकडल्यानंतर सापानेही हळूहळू संपूर्ण गिळंकृत केले. एका स्नॅक कॅचरने उंदराच्या शिकारीचे हे आश्चर्यकारक क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपले आहेत. त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. ट्रिंकेट सापाने या उंदराची शिकार केली. सापाने उंदीर तोंडात धरला. यावर उंदराने आरडाओरडा केला पण तो काही करू शकला नाही. सापाने त्याला पूर्णपणे तोंडात पकडले. नंतर हळू हळू तो गिळायला लागला. मात्र, यावेळी सापाला स्वतःला खूप अस्वस्थ वाटू लागले. पण नंतर त्याने संपूर्ण उंदीर गिळला. काही वेळाने साप हळू हळू तिथून दूर गेला. 
 
राजस्थानातील एकमेव पर्वतीय पर्यटन स्थळ असलेल्या माउंट अबूमध्ये वन्य प्राण्यांच्या हालचाली अनेकदा पाहायला मिळतात. येथे येणारे पर्यटक वन्यजीवांच्या हालचाली पाहून रोमांचित होतात.
 
माउंट अबू येथे राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घराजवळ साप आला होता. इथे त्या सापाने एका जाड उंदराला आपली शिकार बनवले. माऊंट येथील स्नॅक कासार ने आपल्या मोबाईल मध्ये हे चित्तथरारक दृश्य कैद केले असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 
 
Edited By - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती