बॅगची किंमत दीड कोटी रुपये

गुरूवार, 14 जून 2018 (15:36 IST)
कोणती वस्तू कोणास कशी आवडेल आणि त्याला ती कोणत्याही किमतीती विकत घेईल हे सांगणे जरा अवघड आहे. असाच काहीसा प्रकार घडला असून सेकंड हँड बर्केन बॅगवर नुकत्याच लंडनमध्ये पार पडलेल्या एका लिलावात चक्क दीड कोटींची बोली लावण्यात आली आहे. ख्रिस्टीन’च्या अहवलातून हमीस हिमालय बर्केन बॅग चक्क २,७९,००० युरो म्हणजे जवळपास अडीच कोटींहून अधिक किंमतीत विकली गेल्याचं ‘समोर आलं आहे. बॅग जबरदस्त असलेली निलो मगरीच्या कातड्यापासून तयार करण्यात आली असून, त्यावर पांढरं सोनं आणि हिरेही जडवण्यात आले आहेत. हाँग काँगमधल्या एका व्यक्तीनं ही बॅग खरेदी केली होती. नुकतीच लंडनमधल्या लिलावात विकली गेलेली बर्केन बॅग ही दहा वर्षे जुनी होती. दुर्मिळ पांढऱ्या रंगाच्या मगरीच्या कातडीपासून ही बॅग तयार करण्यात आली असून, १९८१ मध्ये फ्रेंचमधल्या एका लक्झरी फॅशन हाऊस हमीसनं या बॅग डिझाईन केली होती. गायक अभिनेत्री जेन बर्केन हिच्या नावावरून या बॅगना बर्केन बॅग नाव देण्यात आले होते. आता भविष्यात जेव्हा ही बर्केन बॅग विक्रीस येईल तेव्हा किंमत नक्कीच खूप वेगळी आणि जास्त असणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती