मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखण्डातील महिलेला ऑनलाईन गेम खेळण्याचं व्यसन लागलं तसेच व्यसन सिधी जिल्ह्यातील सिहावल चौकीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला लागले. ऑनलाईन गेम खेळताना हा मुलगा व महिला एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रियकराच्या प्रेमात वेडी झालेली ही महिला दोन्ही मुलांना घेऊन थेट मुलाच्या घरी आली. मुलाचे घरातील सदस्य महिलेला घरात ठेवण्यास तयार नव्हते. हे प्रकरण पोलिसां पर्यंत गेले. पोलिसांनी येऊन आणि गावकऱ्यांनी महिलेची समजूत काढून तिला परत तिच्या घरी पाठवले. या प्रकरणामुळे गावात खळबळ उडाली आहे.