मृत्यूच्या 30 वर्षांनंतर रीतीरिवाजानुसार झाला 'प्रेथा कल्याणम' अनोखा विवाह,व्हिडिओ व्हायरल!

शनिवार, 30 जुलै 2022 (14:41 IST)
कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात एक अनोखा विवाह पार पडला. ते पाहून लोकांना आश्चर्य वाटते. शोभा आणि चंदप्पा यांचा विवाह मृत्यूच्या 30 वर्षांनी झाला. हे लग्न पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. लग्न पूर्ण रितीरिवाजाने पार पडले, पण या कार्यक्रमात वधू-वर नव्हते. या लग्नाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला असून तो व्हायरल झाला आहे.
 
कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात शोभा आणि चंदप्पा यांचा गुरुवारी पारंपरिक पद्धतीने विवाह झाला. त्यांच्या मृत्यूनंतर 30 वर्षांनी हा विवाह झाला. हे काही सामान्य लग्न नव्हते, ते 'प्रेथा कल्याणम' किंवा 'मृतांचे लग्न' होते.
 
'प्रेथा कल्याणम' ही परंपरा आहे, जी आजही कर्नाटक आणि केरळच्या काही भागात पाळली जाते. जिथे जन्मादरम्यान मृत्यू पावलेल्यांसाठी विवाह विधी केले जातात. येथील समुदाय हा त्यांच्या आत्म्याचा सन्मान करण्याचा मार्ग मानतात.
 
YouTuber अॅनी अरुण यांनी ट्विटरवर या विचित्र सोहळ्याचा प्रत्येक तपशील शेअर केला आहे. मी आज एका लग्नात सहभागी होत असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. या लग्नात सर्व काही आहे, परंतु वधू-वर उपस्थित नाहीत. वर आणि वधू देखील दोघे मयत झाले आहे. त्यांच्या मृत्यूच्या 30 वर्षांनंतर या जोडप्याचे लग्न केले.
 
ते म्हणाले की "..एक पवित्र परंपरा आहे. बाळंतपणात मरण पावलेल्या लोकांसाठी, सामान्यतः प्रसूतीदरम्यान मरण पावलेल्या दुसऱ्या मुलाशी लग्न केले जाते. सर्व विधी लग्नाप्रमाणेच असतात. साखरपुड्या साठी  "दोन कुटुंबे एकमेकांच्या घरी जातात.
या कार्यक्रमात मिरवणूक आणि ‘सप्तपदी’चाही समावेश होता. आयुष्यानंतरही हे जोडपे आनंदाने जगत आहे. त्याचबरोबर यूजर्स अनेक प्रकारे कमेंट करत आहेत. काहीजण या प्रथेचे कौतुक करत आहेत तर काही जण काही चांगले बोलत नाही आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती