अमरेली: सावरकुंडला येथील लल्लूभाई शेठ आरोग्य मंदिरात एक विचित्र घटना समोर आली आहे. नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. मृगांक पटेल यांनी एका वृद्ध महिलेच्या वरच्या पापणीतून 250 हून अधिक उवा आणि 80 अंडी शस्त्रक्रिया करून काढली. गीताबेन मेहता या वृद्ध महिलेला गेल्या दीड महिन्यापासून डोळ्यांच्या आजाराने ग्रासली होती. त्यांना गेल्या दीड महिन्यांपासून डोळ्यात खाज येणे, जळजळ होणे, पापण्या जड होण्याची तक्रार जाणवत होती.