मोदींना नायडू,जेटलीचा पाठिंबा

भाषा

शनिवार, 25 एप्रिल 2009 (21:57 IST)
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानांच्या नावास अरुण शौरीनंतर आता व्यंकया नायडू आणि अरुण जेटली यांनीही पाठिंबा दिला आहे. मोदी 'पी एम इन वेटींग' असून या निवडणुकीत लालकृष्ण आडवाणीच पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांचे नाव या यादीत सर्वात वरती असून, अडवाणीनंतर भाजपचे नेतृत्व मोदींकडेच येणार असल्याची घोषणा भाजप नेते अरुण शौरी यांनी शुक्रवारी केली होती. त्यानंतर पक्ष प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत त्यास दुजोरा दिला होता.

आता व्यंकया नायडू आणि अरुण जेटीली यांनीही आपले अनुमोदन दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मोदी कुशल प्रशासक असून, त्यांनी गुजरातचा विकास केला आहे. जर ते पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंदच होईल.

वेबदुनिया वर वाचा