सोनिया गांधी यांची आज गुजरातमध्‍ये सभा

कॉंग्रेसाध्‍यक्षा सोनिया गांधी आज गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांच्‍या राज्‍यात निवडणूक प्रचारासाठी उतरणार आहे. सोनिया आज गुजरातमध्‍ये तीन सभा घेणार असून नरेंद्र मोदी आणि सोनिया या दोन्‍हींच्‍या सभा मेहसाणा येथे आजच होणार असल्‍याने त्‍यास विशेष महत्‍व आहे.

दरम्‍यान, मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधी यांनी गुजरातमध्‍ये प्रचार सभा घेण्‍यापूर्वी पुरेसा होमवर्क करून यावे असा सल्‍ला दिला आहे. वाढती महागाई आणि बेरोजगारी याशिवाय महिला आरक्षण विधेयकासंदर्भात सोनियांकडून गुजरातच्‍या जनतेला उत्तर अपेक्षित असल्‍याचेही त्‍यांनी म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा