राष्ट्रपतींनी केली कायदेतज्ज्ञांशी चर्चा

राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी नव्या सरकार स्थापनेसंदर्भात कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आज त्यांनी माजी सॉलिसिटर जनरल व प्रसिद्ध विधिज्ञ सोली सोराबजी यांच्याशी चर्चा केली. काल त्यांनी माजी सॉलिसिटर जनरल अशोक देसाई यांच्याशीही चर्चा केली होती.

दरम्यान, पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी सोमवारी सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली असून तीत लोकसभा भंग करण्याचा व मंत्रिमंडळाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. त्यानंतर ते राष्ट्रपती भवनात जातील व पदाचा राजीनामा देतील. यानंतर संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीतर्फे राष्ट्रपतींकडे सरकार बनविण्याचा दावा करण्यात येईल.

वेबदुनिया वर वाचा