लोकसभा निवडणुकीचा सुरवातीचा कल पाहता भारतीय जनता पक्षाने जनादेश मान्य केला आहे.
पक्षाचे प्रवक्ते बलबीर पुंज यांनी सांगितले की, जनतेचा जो ही निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे. सध्या जे निकाल येत आहे, ते दक्षिण भारताचे आहे. त्याठिकाणी पक्षाने जास्त उमेदवार उभे केले नव्हते. उत्तर भारतातील निकाल आल्यावर भाजपची परिस्थिती सुधारले. पक्षाचे दुसरे प्रवक्त प्रकाश जावडेकर यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सर्वात मोठी आघाडी असणार असल्याचा दावा केला आहे.