औरंगाबाद : इम्तियाज जलील 10 हजार मतांनी आघाड़ीवार
लातूरला भाजपचे सुधाकर श्रंगारे 44 हजार मतांनी आघाडीवर
बारामती: सुप्रिया सुळेंना आघाडी
शरद पवारांचा नातू पार्थ पवार पिछाडीवर
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. आज अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य ठरणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.