महाराष्ट्रात भाजपची लाट

गुरूवार, 23 मे 2019 (11:45 IST)
40 जागांवर भाजप पुढे आणि 7 जागांवर काँग्रेस तसचे इतरवर 1 पुढे असल्याची बातमी आहे.
 
 
महाराष्ट्रातील ४८ जागांच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. 
 
उत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर पिछाडीवर
 
नागपूरमध्ये गडकरी आघाडीवर
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे नातू व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे सर्वांचे लक्ष होते परंतू मावळ लोकसभा मतदारसंघात पवार घराण्याला मोठा धक्का बसल्याचे चित्र दिसत आहे.
 
मावळमध्ये शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवारांना लढत दिली होती. शेतकरी कामगार पक्षानंही राष्ट्रवादीला मदतीचा हात दिला होता तरी फायदा झाल्याचं दिसत नाहीये. 
 
शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांची आघाडी कायम, शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पिछाडीवर 
 
हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेचे धैर्यशील माने आघाडीवर 
औरंगाबाद: वंचित बहुजन आघाडीचा इम्तियाज जलील पाचव्या फेरीत पुढे, शिवसेनेचे चंद्रकांत खैरे पिछाडीवर 
येथे इम्तियाज जलील यांची अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्याशी कडवी लढत होत आहे.
 
प्रत्येक ठिकाणी समर्थकांचा जल्लोष सुरू....मतदान केंद्राबाहेर विविध पक्षाचे कार्यकर्ते जमले...प्रत्येक फेरी अखेर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती