[$--lok#2019#state#maharashtra--$]
मुख्य लढत : प्रताप पाटील चिखलीकर (भाजप) विरुद्ध अशोक चव्हाण (काँग्रेस)
गेल्या वेळी महाराष्ट्रात काँग्रेसचे अवघे दोन खासदार निवडून आले होते. दोघंही जण यंदा पुन्हा निवडणुकांच्या रिंगणात उतरण्यास अनुत्सुक होते. अखेर त्यापैकी एक असलेले महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पुन्हा निवडणूक लढवण्यास तयार झाले आहेत. तेही ना’राजी’नाम्याचं नाट्य झाल्यानंतर हे विशेष आहे. मुळात नांदेड हा अशोक चव्हाणांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. मात्र शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्या प्रताप पाटील चिखलीकराची टक्कर त्यांना असेल. त्यामुळे काँग्रेसच्या एकमेव खासदाराला आपली जागा टिकवण्याचं आव्हान आहे.
[$--lok#2019#constituency#maharashtra--$]
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.