[$--lok#2019#state#maharashtra--$]
सलग दुसऱ्यांदा हे दोन्ही उमेदवार आमने-सामने उभे आहेत. धनंजय महाडिक हे सोळाव्या लोकसभा निवडणूकीत खासदार म्हणून निवडून आले. धनंजय महाडिक हे भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. २०१४ ला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील खासदारकीची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा ३३,५४२ मतांनी पराभव केला होता. कोल्हापुरातील राजकीय आणि सहकार क्षेत्रात महाडिक कुटुंबिय गेल्या अनेक वर्षापासून आहे. धनंजय महाडिक यांना संसदरत्न पुरस्कार देण्यात आला होता. संसदेत सर्वाधिक प्रश्न उपस्थित करून देशातील टॉप वन खासदार म्हणून निवड झाल्यानंतर महाडिक यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.