देशी दारूच्या दुकानासमोर दुध वाटून वैशाली येडे यांचा लोकसभेचा प्रचार

शनिवार, 30 मार्च 2019 (07:05 IST)
यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघातील निडणूक चर्चेत प्रहार उमेदवाऱ्याच्या अनोख्या प्रचार पद्धतीने आज प्रहारच्या उमेदवार वैशाली येडे यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला दारूच्या दुकानासमोर दूध वाटून प्रचाराला सुरुवात प्रहार कडून करण्यात आली.
 
यवतमाळ शहरातील दत्त चौक परिसरातील देशी दारू च्या दुकानासमोर आज प्रहार चे अध्यक्ष आ बच्चू कडू यांच्या उपस्तितीत दूध वाटप करून यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या प्रहार च्या उमेदवार वैशाली येडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला त्याच्या या अनोख्या प्रचार पद्धतीची चर्चा सर्वत्र होती. 
 
यावेळी आमदार बच्चू कडू यांनी निवडणुक हि आमच्या साठी आंदोलनं आहे पैसे नाही नेता नाही धर्म नाही जात नाही आहे ते फक्त आमच्या जवळ काम म्हणून निवडणुका विचारावर झाल्यापाहिजे धर्म आणि जातीवर होता काम नये म्हणून सरासरी निवडणुकीच्या काळात मंदिर मस्जिद पुतळे हे पाच वर्षातून एकदा आठवतात आम्ही थोडं पुढे गेलो थोर पुरुषांच्या विचारानां धरून पुढे जात आहे आता देशी दारू नाही दूध घरोघरी पोहचलं पाहिजे दारू बंद झाली पाहिजे हा प्रचाराचं मार्ग आम्ही स्विकारतोयं. 
 
सध्या यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघात भावना नसलेल्या भावना ताई आहेत त्याच्या कधीच भावना मतदाराबद्दल प्रकट झाल्या नाहीत तर दुसरीकडे मेकअप मध्ये गुंग आहेत असे सांगून कॉग्रेस आणि सेना उमेदवारावर टीका केली. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील शेतकऱ्याचे प्रतीक म्हणून वैशाली येडे आहेत जसा क्रिकेट मध्ये सचिन तसा या ठिकाणी शेतकऱ्याचा प्रतिनिधी वैशाली येडे असल्याचे त्यानी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती