गडकरी यांच्याविरोधात सर्वाधिक 29 उमेदवार

शुक्रवार, 29 मार्च 2019 (09:59 IST)
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील पहिल्या टप्प्यात सात जागांसाठी एकूण 116 उमेदवार मैदानात आहेत. नामनिर्देशन पत्रे वैध ठरलेल्या 147 पैकी 31 उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे मागे घेतली असून, 116 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. नागपुरातून विद्यमान केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांच्याविरोधात सर्वाधिक 29 उमेदवार मैदानात असतील. यामध्ये काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचाही समावेश आहे.
 
पहिल्या टप्प्यातील नामनिर्देशन पत्रांच्या छाननीअंती 147 उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरली होती. या टप्प्यासाठी नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत आज दुपारी 3 वाजेपर्यंत होती. या मुदतीत 147 पैकी 31 उमेदवारांनी माघार घेतली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती