पटोले यांना शुभेच्छा मात्र मी निवडून येईल - नितीन गडकरी

शुक्रवार, 15 मार्च 2019 (08:56 IST)
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच राज्याची उपराजधानी आणि सत्ता केंद्र असलेल्या नागपुरात राजकीय सामना सुरु झाला आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नाना पटोले विरुद्ध भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांची मुख्य आणि अगदी थेट लढत होणार आहे. मागील निवडणुकीपेक्षा दुप्पट मतांनी निवडून येईल, असा दावा गडकरींनी केला आहे. तर मागच्या वेळी  गडकरी एका  लाटेत निवडून आले होते, असं म्हणत यावेळी नाना पटोले तीन लाख मतांनी विजयी होतील, असा दावा काँग्रेसचे विलास मुत्तेमवार यांनी केला आहे. मागील लोकसभा  निवडणुकीत मी 2 लाख 80 हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडून आलो होतो, गेल्या पाच वर्षांत अनेक विकासाची कामं मी केली आहेत. त्यामुळे यावेळी दुप्पट मतांनी निवडून येईल, असा दावा नागपूरचे भाजप उमेदवार नितीन गडकरी यांनी केला आहे. गडकरी पुढे म्हणाले की नाना  पटोले माझे मित्र होते आजही आहेत, त्यांना माझ्या निवडणुकीसाठी शुभेच्छा,  मी व्यक्तीगत द्वेषाचं राजकारण कधीच  करत नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती