नवी मुंबईच्या 28 गावांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

मंगळवार, 16 एप्रिल 2019 (09:14 IST)
मागील 30 वर्षांपासून नवी मुंबईमधील विस्तारीत गावठाणाचा, घरांचा प्रश्न अजूनही सोडवला गेला नाही. सत्ता असो कोणत्या ही राजकीय पक्ष हे प्रश्न सोडवत नाही. या प्रश्नाचा फक्त राजकारणासाठी वापर होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. या कारणामुळे नवी मुंबईच्या 28 गावांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. आगरी-कोळी यूथ फाऊंडेशनने आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. नवी मुंबई हे शहर वसवण्यासाठी 1970 साली महानगर पालिका क्षेत्रातील 28 गावांची शेतजमीन, मोकळी जागा, गुरचरण जमीन मूळ गावठाण वगळून सरकारने घेतली अर्थात संपादीत केली. मात्र मागील 40 वर्षांमध्ये या गावांचा गावठाण विस्तार अजूनही  केला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी गरजेपोटी घरे बांधली आहेत. यात व्यावसायिक गाळेही सुद्धा आहेत. या बाधीत गावांतील ग्रामस्थांनी अनेक वर्षे स्वतःची घरे अधिकृत करून त्याला प्रॉपर्टी कार्ड मिळावे याबद्दल मागणी केली आहे. मात्र, प्रत्येक राजकीय पक्ष याचा फक्त राजकीय फायदा घेत असून, घरे अधिकृत करता येऊ शकत असतानाही यात राजकारण करुन ग्रामस्थांना वेठीस धरले असून फक्तत्याचमुळे आता निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतल्याचे आगरी-कोळी यूथ फाऊंडेशनने सांगितले आहे. इतका मोठा मतदान असलेला भाग आता कोणता राजकीय पक्ष आपल्या कडे वळवणार हे येती प्रचार सभाच सांगणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती