शिवसेना: शिवसेना म्हणजे शिवाजीची सेना, वाघासारखा रुबाब, मस्ती आणि आक्रमकपणा

पक्ष : शिवसेना
स्थापना : जून 1966
संस्थापक : बाळा साहेब ठाकरे
वर्तमान प्रमुख : उद्धव ठाकरे
निवडणूक चिह्न : धनुष्य-बाण
विचारधारा : हिंदुत्व आणि क्षेत्रवाद
मराठी माणूस आणि हिंदुत्वाची प्रबळ पक्षधर आहे शिवसेना
 
 
महाराष्ट्रातील स्थानिक लोकांच्या हक्कांसाठी 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. ठाकरे मुळात कार्टूनिस्ट होते आणि ते राजकीय विषयावर तीव्र कटाक्ष करायचे. तसे तर अनेक राज्यांमध्ये शिवसेना सक्रिय आहे, पण त्याचा राजकीय प्रभाव महाराष्ट्र पर्यंतच मर्यादित आहे. 
 
सध्या शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब यांचे पुत्र उद्धव ठाकरे आहे. शिवसेना पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्य-बाण आहे, तर प्रतीक चिन्ह वाघ आहे. शिवसेनेची ओळख हिंदुत्ववादी पक्षाच्या रूपात आहे. वर्ष 2018 च्या शेवटी उद्धव यांनी अयोध्यातील रामललाचे दर्शन करून राम जन्मभूमीची समस्याला परत समोर मांडली. शिवसेनेच्या स्थापनेदरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांनी एक नारा दिला, 'अंशी टके समाजकारण, वीस टके राजकारण'. 'भुमिपुत्र' (स्थानिक निवासी या विषयाला दीर्घ काळापर्यंत समर्थन न मिळाल्यामुळे शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा स्वीकारला, ज्यावर तो अजूनही दृढपणे उभे आहे.
 
पक्षाने 1971 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढले होते पण त्यांना यश मिळाले नाही. 1989 निवडणुकांत पहिल्यांदा शिवसेनेचे खासदार निवडले गेले. 1990 मध्ये पहिल्यांदा शिवसेनेने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूकला लढा दिला, ज्यात त्यांचे 52 आमदारच निवडून आले. 16 व्या लोकसभेत पक्षाचे 18 खासदार आणि राज्यसभेतील तीन खासदार आहे. शिवसेनेचे दोन नेते मनोहर जोशी आणि नारायण राणे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहे. तरी पण नारायण राणे आता शिवसेनेतून वेगळे झाले आहेत. मुंबई महानगरपालिका (बीएमसी) वर देखील बऱ्याच काळापासून शिवसेनेचा कब्जा आहे.
 
1989 मध्ये पक्षाने भाजपसह अलायन्स केले, जे आजपर्यंत तसेच चालू आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. तेव्हापासून, दोन्हीचे संबंध आंबट-गोड असे होते परंतू आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अलायन्स झाल्यामुळे हे स्पष्ट आहे की वैचारिक समानतेमुळे भाजप-शिवसेनेचे हे अलायन्स सर्वात जुने आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती