मुख्य लढत : नितिन गडकरी (भाजप) विरुद्ध नाना पटोले (कॉंग्रेस)
नागपूरमध्ये मुख्य लढत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि कॉंग्रेसचे नाना पटोले यांच्यात आहे. नागपूरकरांसाठी पटोले नवे असून भंडारा-गोंदियामधून आयात करण्यात आले आहेत. ते पूर्वी काँग्रेसमध्ये होते. नंतर भाजपात गेले आणि पुन्हा काँग्रेसमध्ये परतले असा त्यांचा इतिहास आहे.
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.